The page is under process, yet to complete ...
यशोगाथा क्रं. १
LEAD STORY
विद्यार्थ्याचे नाव : धीरज बाबुराव गजघाटे
शाळा / महाविद्यालयाचे नाव : जीवन विकास विद्यालय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, उमरेड.
जिल्हा – नागपूर
४४१२०३
अभ्यासक्रम : ELECTRONICS TECHNOLOGY
व्यवसायाचे नांव :
1. M/s Sanjeevani Hospital Equipments
89, Shreeram
Nagar, Uday Nagar Ring Road, Nagpur – 440034
snjeevanihe@gmail.com
2. M/s Aaral Industries
D-6/14, MIDC,
Umred. Dist. Nagpur
aaralindustries@gmail.com
फोन नं. : 0712-2706477 ई –
मेल : snjeevanihe@gmail.com
मोबाईल नं. : 9373291187 aaralindustries@gmail.com
व्यवसायाचे स्वरूप : संजीवनी हॉस्पिटल इक्वीपमेन्टस या फर्म द्वारे हॉस्पिटलस व त्यामधील ऑपरेशन
थियेटरला लागणाऱ्या सर्व अद्यावत बायोमेडीकल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री व
सेवा उपलब्ध करून दिल्या जाते. नवीन हॉस्पिटल मधील संपूर्ण उपकरणांची फर्निचरसह पूर्तता
करून दिल्या जाते. आमच्याच आरल इंडस्ट्रीज मध्ये दवाखान्यात लागणाऱ्या संपूर्ण
स्टील फर्निचरची निर्मिती केल्या जाते.
रोजगार निर्मिती (सध्या) : १०
वार्षिक उलाढाल : संजीवनी
हॉस्पिटल इक्वीपमेन्टस - १ करोड
आराल इंडस्ट्रीज - ७० लाख
विशेष उल्लेख : जीवन विकास
मध्ये शिकत असताना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स विषयाची संकल्पना स्पष्ट झाली.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दुरुस्ती करण्याची आवड निर्माण झाली. तसेच स्वतः चा
व्यवसाय सुरु करावा हे बीज मनात रोवल्या गेले.
मार्गदर्शक शिक्षक : १) श्री संजय लक्ष्मणराव विसपुते २) प्रमोद दयालाल जयस्वाल
प्रामाणिकपणा व वक्तशीरपणा हेच माझ्या यशाचे गमक आहे.
…धीरज गजघाटे
मी धीरज बाबुराव गजघाटे माझे वडील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे नोकरीला
होते. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. त्यावेळी
माझे वय जवळपास तीन साडेतीन वर्षाचे व माझा लहान भाऊ अवघ्या आठ महिन्याचा होता.
वडील गेल्यानंतर आम्ही जलालखेडा येथे आजोबांकडे राहू लागलो. आईने PHC मध्ये नोकरी सुरु करून आम्हा भावंडांचे शालेय शिक्षण पूर्ण
करवले.
इ. १० वी नंतर पुढील शिक्षणासाठी माझे
मामा श्री श्रावण पिल्लेवान सर यांनी मला
उमरेड येथे आणले. ते जीवन विकास विद्यालय उमरेड येथे शिक्षक होते. त्यांनी त्याच्याच
शाळेत सुरु असलेल्या MCVC (Electronics Technology) या अभ्यासक्रमामध्ये मला प्रवेश मिळवून दिला. आणि तेव्हापासूनच माझ्या
जीवनाला एक दिशा प्राप्त झाली. इ. ११ वी व १२ वी असा दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम
पूर्ण करून मी नागपूरला पदविका (Diploma in Engineering) अभ्यासक्रमाला
प्रवेश घेतला.
परंतु जीवन विकास मध्ये शिकत असतानाच
मला इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची आवड निर्माण झाली होती. तसेच स्वतः चा व्यवसाय सुरु
करावा हे बीज मनात रोवल्या गेले होते. तसेच आईला संसारात मदत करावी या उदेशाने मी Adonis medical equipments या कंपनी मध्ये Service
engineering म्हणून काम करू लागलो. काही वर्ष विविध ठिकाणी अनुभव
घेतल्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले व अवघ्या १००००/- रुपयांच्या
गुंतवणुकीने संजीवनी हॉस्पिटल इक्वीपमेन्टस या नावाने स्वयंरोजगाराला सुरुवात
केली. सुरवातीला हॉस्पिटल फर्निचर व त्यानंतर काही वर्षातच ऑपरेशन थियेटरला लागणाऱ्या सर्व अद्यावत
बायोमेडीकल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री व सेवा उपलब्ध करून देणे मी सूरु
केले.
संजीवनी हॉस्पिटल इक्वीपमेन्टस या फर्मद्वारे विक्री व सेवाउद्योग करीत
असताना, हॉस्पिटल व ऑपरेशन थियेटरला लागणाऱ्या सर्वप्रकारचे फर्निचर स्वतः तयार
करून विक्री करावी अशी कल्पना मनात आली व दुसरी उत्पादन करणारी फर्म सुरु
करण्यासाठी मी व्यवसाय शिक्षण घेतले त्याच उमरेड गावाची निवड केली व उमरेड येथिल MIDC मध्ये स्वतःची आराल इंडस्ट्रीज नावाने कंपनी सुरु केली. बघता
बघता यश पदरी पडू लागले.
मी स्वतः चा व्यवसाय सांभाळून, आईच्या मदतीने माझा लहान भाऊ सचिन देखील उच्च शिक्षित झाला. तो B.Sc. (Biochemical)
तसेच Ph.D. पूर्ण करून आज परदेशात अमेरिका येथे उच्च पदावर नोकरी
करीत आहे.
प्रामाणिकपणा व वक्तशीरपणा हेच माझ्या यशाचे गमक आहे. माझ्या जीवनात माझी आई,
मामा, सर्व शिक्षक वृंद तसेच माझे सर्व सहकारी व शुभचिंतक ज्यांनी मला वेळोवेळी
प्रोत्साहन दिले त्यांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो.
धीरज बाबुराव गजघाटे
यशोगाथा क्रं. २
विद्यार्थ्याचे नाव : दुर्गेश दादारावजी फुकट व सुनील
दादारावजी फुकट
शाळा / महाविद्यालयाचे नाव : जीवन विकास विद्यालय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, उमरेड.
जिल्हा – नागपूर
४४१२०३
अभ्यासक्रम : ELECTRONICS TECHNOLOGY
व्यवसायाचे नांव :
1. चिरंजीवी कॉम्पुटर्स, आशीर्वाद कॉम्प्लेक्स, गिरड रोड उमरेड,
जिल्हा : नागपूर.
2. चिरंजीवी इलेक्ट्रिकल्स, भिसी नाका चौक, उमरेड, जिल्हा :
नागपूर.
मोबाईल नं. : 9370508126 ई – मेल : dfukat@gmail.com
व्यवसायाचे स्वरूप : चिरंजीवी कॉम्पुटर्स या फर्मद्वारे संगणक व त्यासंबंधित सर्व उपकरणांची
विक्री व सेवा उपलब्ध करून दिल्या जाते. तसेच चिरंजीवी इलेक्ट्रिकल्स या
फर्मद्वारे विद्युत क्षेत्रात लागणाऱ्या साहित्याची व उपकरणांची विक्री व सेवा
उपलब्ध करून दिल्या जाते.
रोजगार निर्मिती (सध्या) : ०६
वार्षिक उलाढाल : ५० ते ६० लाख
विशेष उल्लेख : आम्ही दोन्ही
भावांनी व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षकांच्या मदतीले काही महिने प्रत्यक्ष
कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (O.J.T.) पूर्ण केले व स्वयंरोजगाराची
कस धरली व आज आम्ही स्वतःच्या वास्तूमध्ये व्यवसाय करीत आहोत.
मार्गदर्शक शिक्षक : १) श्री संजय लक्ष्मणराव विसपुते २) प्रमोद दयालाल जयस्वाल
यशोगाथा क्रं. ३
“कौशल्यदर्शिका – २०१९”
प्रपत्र
१.
|
विभागाचे नांव
|
नागपूर
|
|
२.
|
प्रशिक्षणार्थ्याचे नाव व पत्ता
|
कुशल अनिलकुमार जयस्वाल
|
|
३.
|
संस्थेचे नाव व पत्ता
|
जीवन विकास विद्यालय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम. उमरेड, जिल्हा-
नागपूर ४४१२०३
|
|
४.
|
व्यवसाय अभ्यासक्रमाचे नाव व उत्तीर्ण वर्ष
|
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी
मार्च २००६
|
|
५.
|
उच्च अर्हता प्राप्त केली असल्यास त्याची माहिती
|
||
६.
|
रोजगार करीत असल्यास,
|
-
|
|
अ. कंपनीचे नाव व पत्ता
|
-
|
||
ब. पदनाम
|
-
|
||
क. कामाचे स्वरूप व वार्षिक वेतन रु.
|
-
|
||
ड.प्रकल्प निर्मिती केली आहे का ?
असल्यास त्याबद्दल थोडक्यात
माहिती
|
-
|
||
इ. संशोधन केले आहे का ? असल्यास त्याबद्दल थोडक्यात माहिती.
|
-
|
||
फ. थोडक्यात इतर उल्लेखनीय माहिती
|
-
|
||
७.
|
स्वयंरोजगार करीत असल्यास,
|
||
अ. कंपनीचे नांव व पत्ता
|
न्यू आशा इलेक्ट्रॉनिक अॅड मोबाईल गॅलरी
मेन रोड, इतवारी. उमरेड, जिल्हा – नागपूर ४४१२०३
मो. 9834884105
|
||
ब. पदनाम
|
प्रोप्रायटर
|
||
क. कामाचे स्वरूप व सेवा/उत्पादन विषयक माहिती
|
मोबाईल फोन विक्री व दुरुस्ती
|
||
ड. वार्षिक उलाढाल रु.
|
१ करोड ५० लाख
|
||
इ. किती लोकांना रोजगार दिला आहे ?
|
३
|
||
फ. थोडक्यात इतर उल्लेखनीय माहिती
|
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्यासक्रमात शिक्षण घेत असतांनाच
स्वतः चा व्यवसाय करण्याचे ठरविले. काही महिने प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन
स्वतः चा व्यवसाय सुरु केला.
|
No comments:
Post a Comment